Wed. May 18th, 2022

साताऱ्यात गर्भवती महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण

साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत. तर डोक्यात दगड मारल्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले? या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे.

1 thought on “साताऱ्यात गर्भवती महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.