ऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी
जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
कॉपी करू द्या, नाहीतर कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्यांनी दिल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडालीय. परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याच्या या प्रकारामुळे प्राध्यापकांची घाबरगुंडी उडाली.
कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढून वर्गात बसवल्यानंतर शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा प्रकार शनिवारी औरंगाबादच्या नवखंडा येथील डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन येथील परीक्षा केंद्रावर घडला.