Mon. Oct 26th, 2020

… आता बघता येणार नाहीत फेसबुक पोस्टच्या लाईक्स आणि कमेंट

फेसबुकवर आपण पोस्ट केलेल्या पोस्टवर किती लाईक मिळाले यावर सगळ्यांची जास्त नजर असते. हल्ली लोकांच्यात पोस्टवरून लाइक-वॉर सुरू आहे. दुसऱ्यांच्या पोस्टला जास्त लाईक मिळाले लोक तर त्रस्त होतात.
अगदी यावरून वादही झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर फेसबुकने लाइक्स लपवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता फेसबुकवर कोणत्या पोस्टला किती लाईक मिळाले हे कळणार नाही. याबरोबर फेसबुक मध्ये बदलही होणार आहेत. यूजर्सच्या पोस्टवर लाइक्स काउंटना हाइ़ड करता येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लॅटफॉर्मवर 27 सप्टेंबरपासून सुरूवात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यामध्ये पोस्ट करणाऱ्याला लाइक्स आणि सोबतच प्रतिक्रिया पहायला मिळतील. परंतु इतरांना त्या दिसणार नाहीत. यामुळे फेसबुकवर म्युच्युअल फ्रेंड्सच्या नावांसह प्रतिक्रियांचे आयकॉन मात्र दिसणार आहेत. फेसबुकवर लाइक्सवरून लोकांच्यात वाद व्हावेत असं वाटत नाही. म्हणून असा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

आता युजर्स एकमेकांच्या पोस्टवर आलेल्या लाइक्स आणि प्रतिक्रिया पाहू शकणार नाहीत. हा झालेला बदल संपूर्ण जगातील युजर्ससाठी अंमलात आणता येईल का याची चाचपणी आम्ही करत असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *