Sat. May 15th, 2021

Facebookच्या ‘या’ निर्णयामुळे whatsappची सुरक्षा धोक्यात

Whatsappवर आपले संदेश आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत युजर्स निश्चिंत असतात. मात्र Facebookच्या निर्णयामुळे whatsappच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Facebookने Messenger, whatsapp आणि instagram या 3 मुख्य सेवा एकत्रित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे मजकुराचे एंड-टू-एंड इन्क्रिप्शन (Coding) सुरक्षित ठेवणे facebookसाठी एक आव्हान असणार आहे.

‘The wired’ या अमेरिकन मासिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. Whatsapp chat एंड-टू-एंड इन्क्रिप्शन केलेले असते. तर facebook messengerमध्ये देखील secret conversation नावाचे फीचर असते.

युजर या फीचरला टर्न ऑन करू शकतात. परंतु instagramमध्ये चॅट संरक्षित करण्यासाठी एंड-टू-एंड इन्क्रिप्शनसारखी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

हे सर्व आव्हानात्मक असल्याचे जॉन हाफकिन्सचे क्रिप्टोग्राफर मॅथ्यू ग्रीन यांनी म्हटले आहे. फक्त whatsappमध्ये एंड-टू-एंड इन्क्रिप्शन अगोदरपासूनच आहे.

त्यात इन्क्रिप्शनची गरज नसलेल्या क्रॉस अॅप ट्रॅफिकला अनुमती देणे हा जर facebookचा उद्देश असेल. तर विचार करा  काय होऊ शकतं, असं वक्तव्य ग्रीन यांनी केले आहे.

सेवांच्या एकत्रिकरणामुळे नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. समजा तुमच्याकडे whatsapp इन्स्टॉल केलेला आहे, मात्र instagram किंवा messenger इन्स्टॉल केलेले नाही.

अशा वेळी या 3 सेवांचे एकत्रिकरण नसेल तर तुम्ही whatsappद्वारे messenger किंवा messenger वर chat करू शकणार नाही.

मात्र  कंपनीने या 3 सेवांचे एकत्रिकरण केलेले असल्यास तुम्ही whatsappद्वारे messenger किंवा messengerवर chat करू शकता.

whatsappचे सहसंस्थापक जेन कूम यांनी गेल्या वर्षी डेटा प्रायव्हसी आणि इन्क्रिप्शनबाबत मार्क झुकरबर्ग यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर कंपनी सोडली होती. कूम हे whatsapp यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत आग्रही होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *