Sun. Jan 16th, 2022

जलयुक्त शिवार अभियानला क्लीन चिट मिळाल्याबाबत फडणवीस म्हणाले…

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या ड्रीम प्रोजक्टला ठाकरे सरकारने क्लीन चीट दिली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी स्थिर असून भूजल पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. आणि अखेर ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचीट मिळाला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 ‘जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी नक्कीच असू शकतात. मी न्यायालयात एक अहवाल दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेगळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वत: म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण ६ लाख कामांसाठी ६०० कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरे झाले असते. पण, ६०० कामांसाठी ती योजनाच पूर्णपणे चुकीची होती, असे बोलणे बरोबर नाही,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *