Mon. Nov 30th, 2020

सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचं जात प्रमाणपत्र बनावट?

नुरंदस्वामी गुरुबसय्या हीरेमठ उर्फ खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. यावरून पडताळणी समितीने महास्वामी यांना म्हणणे मांडण्यासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. महास्वामी यांची जात पडताळणी प्रमाणपत्र विरोधात प्रमोद गायकवाड यांनी तक्रार केली होती.

खासदार महास्वामी यांना बजावलेल्या नोटीस मध्ये तक्रारदार व चौकशीत सादर केलेल्या पुराव्या मध्ये लिंगायत अशी जातीची नोंद आहे.

आपण अनुसूचित जातीचा लाभ घेतला आहे. लिंगायत हा पंथ अनुसूचित जाती पैकी नाही.

‘बेडा जंगम’ ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी आहे त्याचा खुलासा करावा.

15 जानेवारी 1982 रोजी काढलेल्या जंगम जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत दक्षता पथकाने चौकशी केली असता 1982 सालातील प्रमाणपत्र नोंदणी असलेले दोन रजिस्टर दिसून आले.

जात प्रमाणपत्र नोंद असलेल्या रजिस्टर मधील नोंदणीमध्ये अक्षर आणि शिक्काबद्दल व नोंदणी अलीकडील काळातील असल्याचे सदर जात प्रमाणपत्रातील मजकूर हा संगणकावर टाईप केलेला आहे.

आवश्यक ठिकाणी अक्षरं लहान-मोठी केली आहेत असा अभिप्राय चौकशी अधिकारी यांनी दिला आहे.

यावरून जात प्रमाणपत्र अधिकृतरित्या प्राधिकारी कार्यालयातून दिले नसल्याचे व जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून येत असल्याने त्याचा खुलासा करावा, अशी नोटीस खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांना बजावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *