Mon. Dec 6th, 2021

पुण्यात कोरोना चाचणीचा बनावट अहवाल

पुण्यात कोरोना चाचणीचा बनावट अहवाल बनवणाऱ्या रॅकेटचा डेक्कन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सागर अशोक हांडे आणि दयानंद भीमराव खराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत या दोन आरोपींनी १५ ते २० लोकांच्या कोविड आरटीपीसीआर चाचण्यांचे बनावट अहवाल तयार करून दिले आहेत,अशी माहिती मिळाली आहे. मात्र ही संख्या जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीनपॅथ डायग्नोस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या लॅबच्या नावाने अज्ञात व्यक्ती कोविड आरटीपीसीआर चाचण्यांचे बनावट अहवाल देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता मान्यताप्राप्त असलेल्या लॅबमधूनच चाचणी करून खात्रीशीर रिपोर्ट घ्यावे, असं आवाहन पोलिसांनी केला आहे आहे.या आरोपींनी इतर गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *