ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या 95 वर्षी निधन

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध वकील आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांनी दिल्लीतील राहत्या घरी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. राम जेठमलानी यांनी सर्वात मोठ-मोठे खटले लढले आहेत. राम जेठमलानी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा महेश जेठमलानी आणि मुलगी आहे.
कोण होते राम जेठमलानी ?
ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे दु:खद निधन झाले.
गेल्या दोन अठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दिल्लीतील राहत्या घरी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा खटला राम जेठमलानी लढले.
चारा घोटाळ्याचा खटला सुद्धा त्यांनी लढला होता.
सोहराबुद्दिन एन्काउंटर प्रकरणात भाजपा नेते अमित शहा यांचे वकील होते.