Mon. May 17th, 2021

वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात आणखी एका पत्रकाराचा मृत्यू झाल्यानं सर्व पत्रकारिता जगतात शोकाकुळ पसरलं आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिन्यांवरील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले. शिवाय याबद्दलची माहिती ही झी न्यूजचे प्रमुख संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करून दिली.

सरदाना यापूर्वी झी न्यूजवर काम करत होते. झी न्यूजवरील त्यांचा ‘ताल ठोक के’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी झी न्यूजला रामराम ठोकत आज तक जॉईन केले होते. तेव्हापासून ते आज तकवर दंगल या डिबेट शोचे सूत्रसंचालन करत होते.२०१८मध्ये त्यांना गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *