Sat. Mar 6th, 2021

कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस

राज्यात शेतकऱ्यांना बोगस कर्जे वाटप, शेतकरी कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस….

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र तरी याच कर्जमाफीमुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांना बोगस कर्जे वाटप केली गेलीय. अशीच एक घटना वाडा तालुक्यात घडलीय. येथील आदिवासींचा ज्या बँकेशी कधी संबंध आला नाही त्या बँकेने आदिवासी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर हे शेतकरी कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

महत्वाचे म्हणजे या शेतकऱ्यांची कर्जही महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या चौकटीत संबंधित संस्थेने व बँक अधिकाऱ्यांनी बसविल्याने या प्रकरणात शासनाचीही मोठी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदारांकडे तक्रार देऊन या प्रकरणी सहभागी असलेल्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाडा तालुक्यातील आखाडा, उज्जेनी, विऱ्हे या अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील अशिक्षित शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत आयडीबीआय बँकेच्या कुडूस शाखेने सिजेंटा फाऊंडेशन यांच्या मार्फत तीन वर्षांपूर्वी किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या असलेल्या नियमांच्या अधिन राहून कर्जवाटप केले होते. येथील शेतकऱ्यांच्या नावाने ४० ते ५० हजार रुपयांची कर्ज प्रकरणे करून हा कर्ज घोटाळा करण्यात आला होता. वाडा येथील‘आपले सरकार’सेवा केंद्राचे संचालक अनंत सुर्वे यांच्या सजगतेमुळे हा घोटाळा उघड झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *