Tue. Nov 24th, 2020

रावसाहेब दानवे देणार का राजीनामा?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘एवढी तूर घेतली तरी रडतात साले’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून राज्यात सर्वत्र टीकेची झोड उठली.

 

याच प्रकरणात आता शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा उडी घेतली आहे.

 

दानवेंच्या भोकरदनच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांची मुलं उपोषणाला बसली आहेत.

 

हणमंत पवार, मानस पगार,निखिल कदम, सागर साळुंके अशी उपोषणाला बसलेल्या मुलांची नावे आहेत.

 

रावसाहेब दानवेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा तसेच सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी अशा मागण्या या मुलांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *