Sun. Nov 29th, 2020

फॅशन स्ट्रीटवरील फेरीवाल्यांना मुंबई महापालिकेने चांगलाच धडा शिकवला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आकर्षक कपड्यांचा बाजार असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक फेरीवाल्यांना महापालिकेने चांगलाच धडा शिकवला आहे.

 

परवाना असल्यामुळे अतिक्रमण करून तसेच दुसऱ्यांना जागा भाड्याने देऊन धंदा करणाऱ्या 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची धाडसी कारवाई महापालिकेने केली.

 

एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे.

 

मुंबईतील फेरीवाल्यांना परवाने देण्याची मागणी होत असतानाच फेरीवाल्यांच्या अरेरावीमुळे त्यांचे परवानेच रद्द करत महापालिकेने मुजोर फेरीवाल्यांना चांगलीच अद्दल

घडवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *