Jaimaharashtra news

लिंकअपवर फातिमानं दिलं असं प्रत्युत्तर

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून ओळखतात. त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यावर आमिर खानला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं. आमिरने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरवा आला आहे. त्यांचा 15 वर्षांचा संसार मोडला. दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. या घटस्फोटासाठी काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरलं आहे. या प्रकरणी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. नेटकऱ्यांनी फातिमा सना शेखला सोशल मीडियावर चांगलचं सुनावलं आहे.

यापुर्वी देखील आमिरमुळे फातिमाला टीका करण्यात आली होती. त्यावेळी या ट्रोलिंगवर तिनं प्रत्युत्तर दिलं होतं
“सुरुवातीला या ट्रोलिंगला मला भयंकर त्रास व्हायचा. आजपर्यंत इतक्या मोठ्या स्थरावर माझी कोणी निंदा केली नव्हती. एका असा गट ज्यांनी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही. ज्यांना तुम्ही ओळखत नाही. ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वाट्टेल ते बोलतात. यामुळे खूप दु:ख व्हायचं. पण हळूहळू मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. अन् आता तर मला काहीच फरक पडत नाही. कारण केवळ मीच नाही तर जगातील प्रत्येक मोठ्या कालाकारावर अशा प्रकारची टीका केली जाते. त्यामुळं उगाच त्रास करून आयुष्य कशाला खराब करायचं?” फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत फातिमानं असं प्रत्युत्तर दिलं होतं.

Exit mobile version