Sun. Mar 7th, 2021

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या सशुल्क ऑनलाईन दर्शनाचा निर्णय कधी?

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा सशुल्क ऑनलाईन दर्शन निर्णय हा बैठकीत झालेल्या वादामुळे लांबणीवर पडलाय. मात्र बैठकीत वाद होऊनही 70% महाराज मंडळीनी सशुल्क दर्शनाला पाठिंबा दिला आहे. सशुल्क दर्शन सुरू झालं, तर मंदिर समितीला 10 ते 12 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे भाविकांना अजून चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारण्याच्या निर्णयच्या विचारविनिमय बैठकीसाठी वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळी व काही सामाजिक ,राजकीय संघटनेचे पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी वारकरी पाईक संघटनेचे महाराज आणि राजकीय पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि बैठक तहकूब करण्यात आली.

मात्र या बैठकीत 70% महाराज मंडळीनी सशुल्क दर्शनाला पाठिंबा दिला.

लवकरच समितीच्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी सशुल्क दर्शन सुरू झाले तर मंदिर समितीला 10 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न वाढणार आहे. भाविकांना अजून चांगल्या सुविधा देणं शक्य होणार आहे. मात्र बैठकीत गोंधळ झाल्याने निर्णय लांबणीवर पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *