ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

ठाण्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीतील दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचबाची झाली. मागील अनेक दिवसांपासून असलेली ही लढाई आजच्या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी दिसून आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यानतंर काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून स्वतंत्र श्रेयाची बॅनरबाजी दिसून आली.
ठाण्यातील खारेगाव उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्त लोकार्पण करण्यात आले. मात्र, यावेळी शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी श्रेयवादाची लढाई दिसून आली.