Tue. May 11th, 2021

अल्लू अर्जुनच्या ‘या’ चित्रपटाने मोडला ‘बाहुबली’चा विक्रम

बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ‘बाहुबली’ या चित्रपटाचा विक्रम आता मोडला…

बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ‘बाहुबली’ या चित्रपटाचा विक्रम आता नव्या तेलुगू सिनेमाने मोडला आहे. या चित्रपटाने रचलेले विक्रम ताबडतोब मोडणं शक्य नाही असं वाटत होतं. मात्र अल्लू अर्जूनच्या ‘अला वैकुंठपुरामल्लू’ ( Ala Vaikunthapurramuloo ) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘बाहुबली’ (Bahubali)च्या कमाईचा विक्रम मोडला आहे.

Tollywood सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) या चित्रपटाला भारतात नव्हे तर अमेरिकतही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट शनिवारी 11 जानेवारीला प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि तब्बू (Tabu) देखील आहेत. या चित्रपटातील गाणी श्रेया घोषालने गायली आहेत.

अल्लू अर्जुनचा हा सिनेमा फॅमिली एंटरटेनर आहे. USA मध्ये या सिनेमाने ‘बाहुबली’च्या कमाईचा विक्रम मोडला आहे. निव्वळ अमेरिकेतच पहिल्या दिवशी तब्बल 60 हजारांहून अधिक तिकिटं विकली गेल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *