Fri. Dec 3rd, 2021

आता सिद्धूंना फिल्मसिटीतही बंदी

14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. यामुळे देशभरातच नव्हे तर जगभरात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हल्ल्यामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीतही पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली. तसेच टी- सीरिजने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांची गाणी यू-ट्यूबवरून काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांना सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून सुद्धा हकलपट्टी करण्यात आली. आता तर सिद्धू यांना फिल्मसिटीतही बंदी घालण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

त्यामुळे त्यांना द कपिल शर्मा शोमधूनही काढण्यात आले.

पंजाब विधानसभेत सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला.

आता नवज्योत सिंग सिद्धू यांना फिल्मसिटीत बंदी घालण्यात आली.

फेडरेशन ऑफ सिने एम्पलॉईजकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिनेकामगार संघटनेने केलेल्या घोषणेनुसार हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवले होते.

फेडरेशन ऑफ सिने एम्पलॉईजकडून पाकिस्तानी गायक, कलाकारांवर तसंच नवज्योत सिंग सिंद्धूंवरही फिल्मसिटीत बंदी घालण्यात आली.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *