उन्नाव प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय, आरोपी भाजप माजी आमदाराला 10 वर्षांची शिक्षा

4 जुन 2017 ला घडलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टाकडून पीडितेला अखेर न्याय दिला आहे. उन्नाव प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सेंगर आणि त्यांचा भाऊ यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील पीडिता आणि वडिल त्यांच्या गावी परत जात होते. त्यांनी रस्त्यात शशी प्रताप सिंह नावाच्य़ा माणसाकडे लिफ्ट मागितली असता त्यांनी नकार दिला. याचे रूपांतर नंतर वादात झाले. यामुळे सिंह यांनी त्यांच्या साथीदारांना बोलवून घेतले.
यामध्ये भाजप माजी आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांचा भाऊ होते. यांनी पीडितेला आणि तिच्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.
तसेच पीडितेवर सेंगर यांच्याकडून बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर बलात्काराच्या घटनेतील पीडितेला न्यायासाठी अनेक गोष्टींना सामोर जावं लागलं होतं.
पीडीतेचा संशयास्पद अपघात झाला. या अपघातात पीडितेच्या काकू आणि अन्य एका नातेवाईक मृत्यूमुखी पडले. तर पीडीत तरुणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले होते.
यातील पीडीत मुलीच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी सेंगरसह नऊ लोकांवर कोर्टाने आरोप निश्चित केले होते.
कोर्टाने या आरोपींना 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडितेच्या कुटूंबाला प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा सेंगर आणि त्याचा भाऊ अतुल सेंगर यांना आदेश देण्यात आले आहेत,.