Wed. May 18th, 2022

जाणून घ्या, शाळा कुठे चालू, कुठे बंद?

कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आजपासून पुन्हा राज्यातील शाळ सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा धोका कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने  घेतला आहे. मात्र, राज्यात शाळा सुरू करण्याबातब एकसमान धोरण नसून अनेक ठिकाणी शाळा सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे.

मुंबई : २४ जानेवारीपासून शाळा सुरु होणार १ली ते १२वी

ठाणे : २४ जानेवारीला शाळा सुरु होणार १ली ते १२वी

नाशिक : २४ जानेवारीला शाळा सुरु होणार १ली ते १२वी

जळगाव : ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद.

औरंगाबाद : फक्त दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार.

पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार.

कोल्हापूर : २५ जानेवारीला शाळा सुरु होणार १ली ते १२वी

सांगली : १ फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार १ली ते १२वी

नागपूर : २६ जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय

चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही.

सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात १ फेब्रुवारीला निर्णय.

रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात २६ जानेवारी रोजी निर्णय.

रायगड : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार.

पालघर : ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार, इतर वर्ग बंद.

सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही

धुळे : ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद.

नंदुरबार : १ली ते ४थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, ५वी ते १२वी शाळा सुरू करण्याला परवानगी.

बुलढाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही.

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ली ते १२वीच्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद.

वाशिम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात २७ जानेवारी रोजी निर्णय होणार

जालना : २४ जानेवारी पासून शहरी भागातील ८वी ते १२वी तर ग्रामीण भागातील १ली ते १२वी शाळा सुरू होणार

हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात २७ जानेवारीला निर्णय होणार

परभणी : उद्यापासून ९वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, ८वी पर्यंतच्या शाळा बंदच.

अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात २५ जानेवारीला निर्णय होणार

बीड : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

उस्मानाबाद : १०वी आणि १२ वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत २९ जानेवारीला निर्णय

सातारा : १ली ते १२वीच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार.

नांदेड : उद्यापासून जिल्ह्यात ९वी ते १२वीच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच.

यवतमाळ : २७ जानेवारी पासून ९वी ते १२वीच्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच.

अमरावती : पुढील एक आठवडा शाळा बंदच

वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात १ली ते १२वीच्या शाळा उद्यापासून सुरु होणार.

गडचिरोली : उद्यापासून ५वी ते १२वीच्या शाळा सुरू, १ली ते ४थी पर्यंतच्या शाळा बंद

गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

लातूर : संपूर्ण जिल्ह्यात १ली ते १२वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.