Thu. May 19th, 2022

डोंबिवलीत इमारतीमध्ये भीषण आग

डोंबिवलीत एका इमारतीला दुपारी २:३० च्या सुमारास भीषण आग लागली. रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये ही भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला. दरम्यान इमारतीमधील रहिवासी तसंच दुकानदारांना तात्काळ बाहेर काढण्यात आलंय. इमारतीपासून जवळच पादचारी पूल आहे. आगीचे लोट या पुलापर्यंत पोहचले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

डोंबिवली स्टेशनजवळ असणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. एका गोडाऊनमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.आगीनंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठत असून जवळच्या पादचारी पुलावर पाहणाऱ्यांनी गर्दी केली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. दरम्यान इमारतीमधील रहिवासी तसंच दुकानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.