video : वर्ध्यात एका मॉलला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका मॉलला रात्री भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मॉल मधील वस्तू जाळून खाक झाल्या.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका मॉलला रात्री भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मॉल मधील वस्तू जाळून खाक झाल्या. मॉलच्या बाजूलाच असणारी तीन घरेही आगीत सापडली आहेत. मॉलचे कोट्यवधींचे नुकसान या आगीत झाले आहे. मॉलचे मालक असलेल्या मुथ्था यांची ८० वर्षीय आई दुसऱ्या मजल्यावर अडकली होती. तिला सुखरूप काढण्यात आले आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मॉल आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस यंत्रणा, महसूल विभाग तसेच नगर परिषद आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ करीत सहकार्य केले.