राज्यात कोरोनाचा पहिला बळी

राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या कोरोनाग्स्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती एका खासगी वृत्तसंस्थेने दिलं आहे.
मृत झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचं वय ६४ वर्ष इतकं होतं. यामृत्यूसह राज्यात कोरोनाचा हा पहिला तर देशातला तिसरा बळी ठरला आहे.
भारतात कोरोनाचा पहिला बळी हा कर्नाटकात गेला. कर्नाटकामध्ये ७९ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर कोरोनाचा दुसरा बळी हा राजधानी दिल्लीमध्ये गेला. मागील आठवड्यात दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये ६८ वर्षाच्या महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एकूण कोरोनाचे ३९ रुग्ण आहेत. तर देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १२७ वर पोहचला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Helth Organisation) कोरोनाला जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलं आहे.