Mon. Jan 27th, 2020

नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट

देशभरात नववर्षाचे स्वागत उत्साहात केले जात आहे. काही लोक वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध मंदिरात जाऊन दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक पंढरपूर मधील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली आहे. मंदिराला आकर्षक जांभळी रंगाच्या फुलांनी सजवून गाभाऱ्याची शोभा वाढवली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिर समितीने गाभाऱ्यासोबतच मंडपालाही आकर्षक सजावट केली आहे.

हे दृश्य बघून भाविकांकडून मंदिर प्रशासनाचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *