Sun. Feb 28th, 2021

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा खळबळजनक दावा

The Union Minister for Rural Development, Panchayati Raj, Drinking Water & Sanitation and Urban Development, Shri Narendra Singh Tomar addressing at the launch of the Swachh Sarvekshan (Gramin)- 2017, in New Delhi on August 08, 2017.

नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी क्षेत्राबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर बाहेरील शक्तींचा दबाव होता, त्यामुळे पाहिजे तसे काम शरद पवार आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करू शकले नाही. असा खळबळजनक दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे. याविषयी ते शेतकरी संघटनांशी सोमवारी बोलत होते.

तोमर यांनी म्हटलं, “अनेक आयोग, मंत्री, अनेक मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारांनी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न केले. युपीएच्या कार्यकाळात तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री शरद पवार यांनाही ही कृषी क्षेत्रातील या सुधारणा लागू करायच्या होत्या. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्यानं ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत.” सध्याला कृषी विधायक कायदा विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यावर काही तोडगा निघाला नाही आहे. मागील काही दिवसात शेतकरी संघटनेबरोबर अनेक बैठक झाल्या मात्र यामधून काही पर्याय निघला नाही. तोमर यांनी म्हटलं की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकच मिशन आहे ते म्हणजे विकास. जनतेचं भलं व्हावं हेच त्यांचं एकमेव मिशन आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव मोदींवर काम करु शकत नाही. या शक्ती मध्ये अपयशी ठरल्याने त्या आता विफल झाल्या आहेत, असं तोमर यांनी सांगितलं शिवाय केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांशी पुन्हा सरकार चर्चा सुरु करणार आहे. त्यापूर्वी कृषी मंत्री तोमर यांनी हे विधान केलं आहे. विविध शेतकरी संघटनांच्या एका संयुक्त समितीने देखील तोमर यांची भेट घेऊन त्यांच्या कृषी कायद्यांना आपला पाठींबा असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *