Sat. Nov 28th, 2020

भाजपच्या माजी आमदारा विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेत महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच भाजपला धक्का मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकांनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका निला सोंस यांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले.

विशेष म्हणजे पीडित निला सोंस यांनी याप्रकरणी भाजपकडे स्टिंग ऑपरेशन आणि तक्रारही केली. मात्र, मेहतांवर अद्यापही कारवाई झाली नाही. अशी तक्रार सोंस यांनी केली आहे.

मेहतांकडून माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचीही भीती सोंस यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी निला सोन्स यांनी यासंदर्भात सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली. त्यानंतर त्या स्वत: माध्यमांसमोर आल्या.

निला सोंस यांच्या आरोपांवर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी काहीही बोलणं टाळलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मेहता यांनी अचानक भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

त्यावेळी यामागील कारण स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर भाजपकडूनच आपली कोंडी होऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधीमंडळात उमटले. महिला आमदारांनी याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर नरेंद्र मेहतांसंदर्भातील तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आहेत.

मेहतांवर भाजपच्याच नगरसेविकेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावर भाजप काय भूमिका घेते, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *