Thu. Feb 25th, 2021

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामुळे चीनला मोठा फटका

रशियन वृत्तसंस्थेचा मोठा दावा…

जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यामध्ये आणि चीन सैन्यात जो संघर्ष झाला यात एक मोठा खुलासा झाला आहे. रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने एक मोठा दावा केला आहे. जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 45 जवान शहीद झाले. आता यात रशियाने एक दावा केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या विषयी माहीती दिली असून गलवान खोऱ्यात किती सैनिक ठार झाले ते चीन
अद्यापही जाहीर केलं नाही तसेच भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आज संसदेत सांगितले. लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर ते बोलत होते.

पँगाँग टीसओ सरोवराच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदमध्ये दिली. पँगाँग सरोवर भागाचा मुद्दा हा मुख्य कळीचा आहे. चीनने इथे फिंगर फोरपर्यंत सैन्य तैनात केल्यानं वाद चिघळत गेला आहे. “चीन बरोबर सतत सुरु असलेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीवर सहमती झाली आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *