Thu. Dec 3rd, 2020

महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, रुग्णांचा आकडा १२४वर

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. तरीही कोरोना नियंत्रणात येत नाही. कोरोनामुळे राज्यातील चौथा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमधील वाशी येथील खासगी रुग्णालयात कोरनाचा चौथा बळी गेला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णाच वय हे ६५ होतं.

दुसऱ्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. आतापर्यंत ताज्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांचा आकडा हा १३०वर जाऊन पोहचला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा हा मागील २४तासांमध्ये तब्बल २३ रुग्णांची नोंद झाली आहे.

तर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ६४९ इतका आहे. तर देशात कोरोनामुळे एकूण १३ जण दगावले आहेत.

कोरोना रुग्णांची शहरनिहाय आकडेवारी

मुंबई – 51
वसई विरार – 1
ठाणे – 5
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
उल्हासनगर – 1
पनवेल – 1
रत्नागिरी – 1
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 9
सातारा – 2
औरंगाबाद – 1
अहमदनगर – 3
नागपूर – 4
यवतमाळ – 4

दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *