पत्नीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या मित्राची पतीने केली हत्या
पुण्यातील धक्कादायक प्रकरण

पुण्यातील वाकड परिसरात पत्नीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या मित्राचे पतीनेच अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीशी आपलाच मित्र अश्लील बोलत असल्याचे समजात पतीनेच मित्राचे अपहरण करत हत्या केली आहे. रोहित कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव असून गुरुवारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. रोहितच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र पोलिसांना रोहितचा मृतदेह संगमवाडी येथे हाती लाागला.
नेमकं काय घडलं ?
पत्नीशी मित्र अश्लील बोलत असल्यामुळे पती आकाश साळवेने मित्राचे अपहरण केले.
आकाश साळवेने मित्र इलियाजच्या मदतीने रोहितचे अपहरण केले.
आकाश आणि इलियाजने रोहितला लोणावळा फिरण्यासाठी जाऊ असे म्हणत त्याचे अपहरण केले.
दोघांनी मिळून त्याला तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे घेऊन त्याची हत्या केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी आकाशने रोहितचा मृतदेह पुण्यातील संगमवाडी नदीत फेकून दिला.
रोहित घरी परतला नसल्यामुळे त्याच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रोहितचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांना संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.