भांडण लोकांशी पण हत्या आपल्याच मित्राची!

भांडण दुसऱ्याशी लोकांशी पण हत्या आपल्याच मित्राची, अशी काहीशी दुर्दैवी घटना सांगली येथे घडली आहे. या प्रकरणी एका तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
काय घडलं होतं नेमकं?
मिरजेतील संजयनगर झोपडपट्टी येथील परशुराम कट्टीमनी या तरुणाची 14 ऑक्टोबर 2013 रोजी निर्घृण हत्या झाली होती.
परशुराम याचा मित्र जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे यानेच ही हत्या केली होता.
दुर्गामाता उत्सवा दरम्यान ही हत्येची घटना घडली होती.
आरोपी जितेंद्र याचं दुसऱ्या काही मुलांच्या बरोबर 13 ऑक्टोबर रोजी भांडण झालं होतं.
यानंतर जितेंद्र हा परशुरामकडे आला होता.
त्याने भांडणाची सर्व हकीकत सांगत परशुराम याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले.
मात्र परशुराम याने पैसे देण्यास नकार दिला.
यातून परशुराम आणि जितेंद्र यांच्यात वादावादी झाली.
यानंतर रात्री उशिरा घरी निघालेल्या परशुराम याला जितेंद्रने गाठलं.
दारूसाठी पैसे दिले नाहीत, या रागातून जितेंद्रने परशुराम याच्यावर कुऱ्हाडीनी हल्ला करत हत्या केली.
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हेगाराला शिक्षा
या खटल्याची सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यामध्ये सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले. यात मयत परशुराम याचा भाऊ आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या आधारे न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ प्रदीप तायडे यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या खटल्या कामी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिलं.