Sat. May 15th, 2021

धार्मिक देणग्यांवर बंधन, विनापरवानगी देणगी गोळा करता येणार नाही…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धार्मिक-सामाजिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून देणग्या गोळा करणाऱ्यांना सरकारने चाप लावला आहे. यापुढे विनापरवानगी कोणालाही देणग्या अथवा निधी गोळा करता येणार नाही.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनेकदा पूरग्रस्त, भूकंपग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांच्या नावे देणग्या-निधीसाठी
सक्ती केली जाते. त्यातून वादही उद्भवतात.

 

यापुढे कोणतीही खासगी, अशासकीय संस्था आणि व्यक्तिंना धार्मिक आणि सामाजिक प्रयोजनासाठी देणग्या उकळता येणार नाहीत. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *