Fri. Apr 16th, 2021

गडचिरोलीत ‘या’ कारणास्तव शंभर विद्यार्थिनींनी सोडली शासकीय आश्रम शाळा

गडचिरोलीच्या शासकीय आश्रम शाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती न झाल्याने संतप्त झालेल्या शंभर विद्यार्थिनींनी आज येथील शासकीय आश्रमशाळेला रामराम ठोकला.

गडचिरोलीच्या शासकीय आश्रम शाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती न झाल्याने संतप्त झालेल्या शंभर विद्यार्थिनींनी आज येथील शासकीय आश्रमशाळेला रामराम ठोकला. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सिरोंचा येथे २०१३ मध्ये अनुसूचित जातीच्या(नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा सुरु करण्यात आली. सद्य:स्थितीत या शाळेत 178 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने या मुलींनी वसतीगृह सोडलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

गडचिरोलीच्या शासकीय आश्रम शाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती न झाल्याने शंभर विद्यार्थिनींनी आज येथील शासकीय आश्रमशाळा सोडली आहे.

परंतु सत्राच्या सुरुवातीपासूनच येथे महिला अधीक्षक वा महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थिंनीच्या आरोग्याचा काळजीवाहक तेथे कुणीच नाही.

यासंदर्भात विद्यार्थिनींनी 10 दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देऊन 10 दिवसांत अधीक्षिका अथवा महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.

नियुक्ती न झाल्यास सर्व विद्यार्थिनी सामूहिकरित्या शाळा सोडतील, असा इशारा दिला होता.

त्यानंतर सर्वांनी शाळेला रामराम ठोकला. दरम्यान काही विद्यार्थिनींचे पालक रविवारी शाळेत पोहचणार असून, त्याही शाळेतून पलायन करणार आहेत.

याच विभागाच्या शाळेतील विद्या‍र्थिनींवर शाळा सोडण्याची पाळी आल्याने सामाजिक न्याय विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

gadchiroli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *