Wed. Dec 1st, 2021

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदचे आवाहन, हिंसक कारवाया सुरू

नक्षलवाद्यांकडून 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. या बंद दरम्यान नक्षल्यांनी रात्रीपासूनच हिंसक कारवाया सुरू केले असल्याच सांगण्यात येत आहे.  एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्लीपासून काही अंतरावर नक्षल्यांनी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या ट्रक जवळ झाडे तोडून टाकली आहेत तसेच बॅनर बांधून आलापल्ली -एटापल्ली रस्ता या नक्षलवाद्यांकडून आडवण्यात आला आहे. सध्या रस्ता सुरळीत सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच भामरागड जवळील पर्लकोटा नदीजवळ बॅनर बांधले आहे.

नेमक काय घडलं?

नक्षलवाद्यांकडून 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.

नक्षल्यांनी झाडे तोडून रस्ता अडवला असून  बॅनर बांधण्यात आले आहेत.

या बॅनरवर 27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीचा उल्लेख केला आहे.

बॅनर मराठी भाषेतून असल्यामुळे हे सगळ शहरी नक्षलवाद्याच काम आहे अशी शंका वर्तवण्यात येत आहे.

बंद दरम्यान नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात सांगण्यात येत आहे.

अतिदुर्गम आणि सिमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नक्षल्यांच्या कृत्यामुळे दुर्गम भागातील विकासकामे ठप्प पडली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *