Fri. Apr 16th, 2021

गडचिरोलीत पोलीस महासंचालकांची घटनास्थळास भेट

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये कुरखेडा मध्यरात्री दादापूर येथे तब्बल 36 वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाले . खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. या घटनेने अख्या महाराष्ट्रावर आणि पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलीस महासंचालकांची घटनास्थळास भेट

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला.

या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले आहेत.

मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती.

कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला.

राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, गडचिरोलीतील पोलीस अधीक्षक, यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

नक्षलवाद्यांची पत्रक

गडचिरोलीतील उत्तर भागात नक्षलींनी गुरुवारी पत्रके लावली आहेत.

यात ४० नक्षलींच्या हत्येचा बदला, विकासकामांना विरोध या मुद्यांवरुन त्यांनी हे हल्ले केल्याची चर्चा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *