Mon. Jul 6th, 2020

‘ये तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल…’ गणेश नाईक यांचं जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी नाना पाटेकर यांच्या जाहिरातीतील डायलॉग बोलून गणेश नाईक यांनी आव्हाज यांना आव्हान दिलं आहे.

‘कोणी मुंबईवरून, कोणी ठाण्यावरून, कोणी पुण्यावरून या शहराचा कारभार करू शकतो का आणि करू शकतील तर पहिला तुमच्या शहरात करा.’ असा टोमणा नाईक यांनी आव्हाड यांचं नाव न घेता मारला. तसंच आव्हाड यांनी केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपांवर उत्तर देताना जर कुणी आपल्याला खंडणी बहाद्दर म्हणत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावं, की गणेश नाईक वर एक NC पण नाही, असं उत्तर दिलं.

‘गणेश नाईक ह्यांनी आपल्या मुलाच्या तिकिटावर स्वतः उभं राहून त्याचा राजकीय बळी घेतल्याची’ खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याला उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले, ‘संदीप नाईकचा बळी दिला म्हणतोय पण मी संदीपला इथून लढ म्हणालो होतो हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे’ अशी आठवण नाईक यांनी करून दिली.

हाथी चलता है अपनी चाल

जितेंद्र आव्हाड यांच्या टिकेवर उत्तर देताना ‘हाथी चलता है अपनी चाल, अब जिस्को जो समजना है समजलो.’ असं म्हणत सूचक इशारा दिला.

“हिम्मत असेल तर गणेश नाईक यांच्या खंडणीखोरीचे पुरावे देऊन केसेस करा, गणेश नाईक ताकदीने उभा आहे.” असं आव्हान जितेंद्र आव्हाडांना गणेश नाईकांनी दिलं आहे.

‘ये तेरे बस की बात नही तेरे बाप को बोल और नाम पुछा तो बोलो गणेश नाईक.’ असा नाना पाटेकर यांच्या एका जाहिरातीतील डायलॉग म्हणत गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *