Thu. Jul 16th, 2020

सांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना…

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगली जिल्ह्यातील तुरची गावात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि सागर यांच्यासहित एकूण 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या पतीला गाडीत डांबून या महिलेवर या 8 जणांनी अत्याचार केले. 

काही महिन्यांपूर्वी या दाम्पत्याने हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप हवं होतं ते त्याच्या शोधात होते. काही ग्राहकांकडे याबाबत त्यांनी विचारणा देखील केली होती.

मंगळवारी रात्री संशयित मुकुंद माने याने पीडित महिलेच्या पतीशी मोबाईलवर संपर्क साधून तसं जोडपं मिळाल्याची माहिती दिली.

त्यांना भेटण्यासाठी संशयित आरोपीने दोघांना तुरची फाट्यावर बोलवलं. त्यानंतर  बरोबर आलेल्या या महिलेच्या पतीला मारहाण केली आणि  एका कारमध्ये डांबले. 

नंतर त्यांच्याकडे असलेले पैसे तसेच महिलेच्या अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले. एवढेच नव्हे तर 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेवर बलात्कारही केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *