Fri. Dec 3rd, 2021

मुलाची शेंडी खेचली म्हणून अभिनेत्यावर होतेय जोरदार टीका; अखेर ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर…

अभिनेता गश्मीर महाजनी हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी गश्मीरनं फेसबुकवर आपल्या मुलासोबतचे काही क्यूट फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दोघांनीही पांढरं धोतरं नेसलं आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. गश्मीरचा दोन वर्षांचा मुलगा व्योम याचं टक्कल केलेलं असून एक शेंडी मात्र दिसत आहे. एका फोटोत गश्मीर ही शेंडी ओढताना दिसत आहे. यावरुनच नेटकऱ्यानी गश्मीर महाजनी चांगलचं सुनावलं आहे. हिंदू धर्माचा अपमान करतोय अशी टीकाही काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर केली. अखेर त्यानं देखील “धर्म म्हणजे काय मला शिकवू नका” अशा खणखणीत शब्दात ट्रोलर्सला प्रत्युत्तर गश्मीर दिलं. यावर अनेकांचा आक्षेप असल्याचं कमेंटद्वारे दिसून येत आहे. शिवाय टीकाकारांनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला आहे. त्यानं आपल्या मुलाची शेंडी ओढून या विधिचा अपमान केलाय की काय? अशी शंका काही नेटकऱ्यांनी घेतली मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले आहेत. तो हिंदू धर्माचा अपमान करतोय अशी टोकाची टीकाही काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *