संपूर्ण महाराष्ट्रामधील ‘हे’ आहे एकमेव जेष्ठा-कनिष्ठा गौराईचं मंदिर

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेलं एकमेव जेष्ठा आणि कनिष्ठा गौराईचं मंदिर अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील पणज येथे आहे. येथे दरवर्षी गौराईच्या दिवसात 3 दिवस उत्सव असतो. ज्याप्रमाणे आपण घरी गौराईचं 3 दिवस मोठ्या थाटामाटात आगमन करून त्यांचा सण साजरा करतो, त्याप्रमाणे पणज येथील मंदिरातही हे 3 दिवस मोठे उत्साहात पार पाडतात.
येथे अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याचे सांगितलं जातं.
येथे भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि या गावराईच्या दर्शनासाठी भक्त बऱ्याच दुरून दर्शनालाही येतात.
आख्यायिका
महागाववरून एक जण बैल बंडी मध्ये या महालक्ष्मीला घेऊन येत होता. अट होती ती मागे न पाहण्याची.
त्या बैलगाडी वाल्याने मागे वळून पाहिलं आणि त्या गौरी गायब झाल्या आणि त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं.
असं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचं बोललं जातं.
या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
या 3 दिवसात खूप दूरपर्यंत दर्शनाच्या लाईन लावल्या जातात.
गौराई जेवणाच्या दिवशी 40 ते 50 पोत्यांचा भांडारा असतो. खूप मोठ्या प्रमाणात देणगी पण भक्त देतात आणि हा उत्सव 3 दिवस मोठ्या थाटामाटात पार पाडतो.