Sat. Jul 4th, 2020

‘या’ प्रकरणात गौतम गंभीर यांच्याविरूद्ध फसवणूकीचं आरोपपत्र दाखल

दिल्ली पोलिसांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यावर फ्लॅट खरेदी प्रकरणात फसवणूक तसेच विश्वास भंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यावर फ्लॅट खरेदी प्रकरणात फसवणूक तसेच विश्वास भंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गौतम गंभीर यांच्या व्यतिरिक्त मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबिता खुराणा या कंपनीच्या प्रवर्तकांचीही आरोपपत्रात नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?

२०११ मध्ये इंदिरापुरम, गाझियाबाद येथे रिअल इस्टेट प्रकल्पात त्यांनी फ्लॅट बुक केला होता, असे नमूद करून 50 हून अधिक घर खरेदीदारांनी या प्रकरणात गौतम गंभीर आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली.

रुद्र बिल्डवेल रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि एचआर इन्फ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेड यांनी हा प्रकल्प संयुक्तपणे सुरू केला. या प्रकल्पात ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून गौतम गंभीर यांचे नाव कंपन्यांनी ठेवले आहे. यानंतर हा प्रकल्प चालू शकला नाही. 2016 मध्ये घर न मिळाल्याबद्दल आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

प्रकल्पाच्या बांधकाम मंजुरीचा कालावधी 6 जून 2013 रोजी संपला असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. असे असूनही, विकासकांनी जून-जुलै 2014 पासून लोकांशी बिल्डर-खरेदीदाराचे करार केले. त्यांनी 23 जून 2013 नंतर लोकांकडून पैसे जमा करणे सुरू ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *