Fri. Apr 23rd, 2021

गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी भाजपात प्रवेश केला होता. दिल्लीमधून भाजपाकडून गंभीरला उमेदवारी मिळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. सोमवारी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये गौतम गंभीर यांना पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मीनाक्षी लेखी यांनी नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

गौतम गंभीरला उमेदवारी जाहीर –

माजी क्रिकेपटू गौतम गंभीर यांनी भाजपात प्रवेश केला.

तेव्हापासून दिल्लीमधून त्यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू होती.

सोमवारी भाजपाने उमेदवारी यादी जाहीर केली.

या यादीत पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तसेच मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाबद्दलचे व्हिजनमुळे मी प्रभावित झालो असं त्यांनी भाजपात प्रवेश करताना म्हटलं होतं.

तसेच देशासाठी काही करण्यासाठी हा उत्तम व्यासपीठ आहे असंही गौतम गंभीर यांनी म्हटलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *