अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने एकूण 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलं आहे. यात एकूण 4 दिग्गजांना मरणोप्रांत पद्मविभूषण पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे.

मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेल्यांची नावं
जॉर्ज फर्नांडीस
अरुण जेटली
सुष्मा स्वराज
श्री विश्वेतेर्थे स्वामीजी
या 4 दिग्गजणांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आलं आहे.
कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस, माजी मंत्री अरुण जेटली आणि सुष्मा स्वराज यांना सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरीसाठी मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आलं आहे.
मेरी कॉम यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मविभूषण पूरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
छन्नूलाल मिश्रा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर अनिरुद्ध जुगनाथ जीसीएसके यांनाही सार्वजनिक क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळणार आहे.