घोडेमुख जत्रेवर कोरोनाचा सावट…
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गाव मर्यादित जत्रा घेण्यात आली…

सिंधुदुर्ग : तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोडेमुख जत्रोतस्वास महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकटं यामुळे या जत्रोत्सवावर कोरोनाचे सावट दिसल्याने केवळ मर्यादित जत्रा करण्यात आली. मळेवाड,न्हावेलीं व मातोड पेंडूर या तिन्ही गावच्या सीमेवरील अतिशय दुर्गम अश्या घोडेमुख डॉगरावर हे वसलेले देवस्थान आहे.
भाविकांना एक तास पायपीट करत दर्शनास जावे लागते. जत्रोत्सवात हजारो कोबे याचा बळी दिला जातो तर एखाद्या व्यक्तीस शरीराचा त्रास असल्यास मातीचा अवयव दान करण्याची प्रथा आहे. कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी गाव मर्यादित जत्रा घेण्यात आली केवळ मानाचा कोब्याचा कोंबा याचा बळी देण्यात आला. कोरोनाचे संकट या जत्रोत्सवावर दिसले.