Wed. Aug 5th, 2020

जे घडलं ते ठरवून केल्यासारखं होतं- गिरीश महाजन

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत होत्या. आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून याचे कारण स्पष्ट केले. शरद पवारांना माझ्यामुळे त्रास झाला. आणि त्यांच नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये माझ्यामुळे गोवण्यात आलं म्हणून राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रीया

ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सर्वच नाट्यमय आहेत.  असे आपल्याला वाटते, जे काही घडलय ते ठरवून केल्या सारखं आहे. 24 तास दादा अज्ञात वासात होते , बारामतीत पुरग्रस्ताना मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, खरं खोट तेच सांगू शकतील.

ईडीच्या चौकशी न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. त्याला समोर जायला पाहिजे, ही चौकशी आहे यात घाबरण्यासारखं काही नाही. मागच्या काळात पंतप्रधान, अमित शहा देखील अशा चौकशीला समोर गेले आहेत. ही चौकशी सात वर्षांपासून सुरू आहे.

केव्हा ना केव्हा वेळ येणारच होती. आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी ते गेले होते. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.

इलेक्शन आहे म्हणून सोडून द्या असं म्हणून कसे चालणार, ही चौकशी सरकारच्या आदेशाने नव्हे तर न्यायालयाच्या आदेशानुसार आहे, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, ती सरकारच्या हातात नाही,याचा सरकारशी कोणताही संबध नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव विमानतळावर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *