Thu. Nov 14th, 2019

पुरासंबंधी चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे गिरीश महाजनांचे आदेश

सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. सांगली, कोल्हापूरच्या व्हिडीओ वापरून अफवा पसरवल्या जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी हे आदेश दिले आहेत.

सांगली, कोल्हापूर मध्ये गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावे पुराच्या पाण्याने ओढावलेली होती. पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. या महापुरामध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच चुकीची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. यावर सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

सोशल मीडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. सांगली, कोल्हापूरच्या व्हिडीओ वापरून अफवा पसरवल्या जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी हे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावरून चुकीच्या आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांना दिले आहेत. पुरामुळे सांगली जिल्ह्यात 22 लोक मृत झाल्याची कबुली महाजन यांनी दिली मात्र सोशल मीडियावर चार हजार लोक मृत झाली आहेत अशा अफवा पसरवल्या जात आहेत.

सांगली, कोल्हापूर मध्ये गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावे पुराच्या पाण्याने ओढावलेली होती. यामध्ये 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सांगलीतील हा आकडा खोटा असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्या खोट्या असून आशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये..असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *