पाण्यावरून राजकारण होत असल्याच्या आरोपाला गिरीश महाजनांचे ‘हे’ उत्तर

कालवा समितीने चाळीस टक्के पाणी लाभक्षेत्रात नसताना बेकायदेशीरपणे बारामतीला दिले होते. त्यामुळे बारामती आणि इंदापूरला बेकायदाशीर दिलेले पाणी आता 2.2 टिएमसी पाणी फलटण, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला मिळणार असल्याचे वक्तव्य माढा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. त्यानंतर निरा डावा कालव्यातील अतिरिक्त पाणी बंद करून बारामतीकरांचे पाणी बंद करणार असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे पाण्यावरून वाद उफळून आला.
नेमकं प्रकरण काय ?
बारामतीकरांचे पाणी बंद करू असा इशारा गिरीश महाजन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिले.
राजकारण करावं पण कुठे करावे याचे भान ठेवावे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
या प्रश्नात पडू नये, वाद वाढवू नये. ज्यावेळी संबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे.
यावेळी अशा प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.
यासंदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया ?
पाण्यावरून सध्या होत असलेल्या वादवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाण्यावरून कुठल्याही प्रकारचे राजकारण होत नाही आहे.
नीरा देवधर धरणातून इंदापूर आणि बारामती या दोन्ही ठिकाणी पाणी पुरवले जात होते.
मात्र धरण आणि कॅनलचे काम पूर्ण झाले असून करार संपल्यामुळे नियोजनामध्ये इतर गावांचाही समावेश आहे.
तसेच त्या गावांना सुद्धा पाणी पुरवणे आवश्यक असून वंचित शेतकऱ्यांना सुद्धा या पाण्याचा लाभ मिळण्यासाठी धडपड सुरू आहे.
त्यामुळे राजकारण होत असल्याचे बिनाबुडाचे आरोप लावण्यात येऊ नये असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं.