यवतमाळमध्ये दोघांकडून 17 वर्षीय तरूणीवर चाकू हल्ला
यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ दोन तरूणांकडून १७ वर्षीय तरूणीवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ दोन तरूणांकडून 17 वर्षीय तरूणीवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नंदकिशोर चौधरी याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तो वर्धातील चाहूर येथे राहण्यास आहे. त्याचा एक साथीदार चाकूसह पसार झाला आहे.
नेमकं काय घडलं?
वर्धा येथील एक 17 वर्षीय तरूणी यवतमाळातील एका विद्यालयात शिक्षण घेत असून ती यवतमाळ येथे वास्तव्याला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ती तरूणी एका महिलेसह काही कामानिमीत्त बाहेर निघाली होती.
अशातच बसस्थानकपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ दुचाकीस्वार दोन तरूणांनी त्या तरूणीला अडविले. त्यानंतर तरूणीसोबत असलेल्या महिलेला धक्का देवून त्या तरूणीच्या पोटावर चाकूने हल्ला केले. यावेळी तरूणीसह महिलेने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेवून चाकू हल्ला करणाऱ्या तरूणांना पकडून चांगलाच चोप दिला.
दरम्यान एकाने त्या ठिकाणाहून पळ काढला तर एकाला नागरिकांनी पोलीसांच्या स्वाधीन केले. पळ काढलेल्या साथीदार अद्याप फरार आहे. हल्ला करण्यामागचं नेमकं कारण समजू शकल नसल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत. त्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे. तर त्या जखमी तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.