Thu. Jul 16th, 2020

अल्पवयीन मुलीचे अपहरण, वडिलांच्या जवळून नेले उचलून

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे अट्टल गुन्हेगार आणि वाळु तस्करांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिलांच्या जवळून उचलून नेल्याची घटना घडलीय. मुलगी झोपेत असतांना उचलून चारचाकी वाहनांत टाकून नेण्यात आलं होतं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री आई शेजारी झोपली असताना मध्यरात्री 2 वाजेदरम्यान येथीलच अट्टल गुन्हेगार आणि वाळु तस्कर किशोर साहेबराव माळी आणि संजय भगवान बर्डे यांसह 3 अज्ञात लोकांनी अल्पवयीन मुलीस पळवून नेले. पळवून नेत असतांना मुलीच्या वडिलांनी चारचाकी काळ्या रंगाच्या गाडीत मुलीला टाकत असतांना बघितले. यावेळी मुलीच्या वडिलांनी आरडा ओरडही केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत मुलीला पळवून नेण्यात यशस्वी ठरले.

या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी किशोर माळी याच्या मुसक्या आवळल्या तसेच अल्पवयीन मुलगीही सापडली असल्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *