Jaimaharashtra news

सांगलीत प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या

सांगली शहरात एसटी स्टॅंड येथील एका लॉजवर तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आला असून लॉजच्या रूमवर तरुणीचा मृतदेह आढळला आहे. लॉजवरील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना बोलविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपास करण्यास सुरुवात केली. मात्र घटनास्थळी काही आढळले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

सांगली शहराच्या एसटी स्टॅंड नजीक असलेल्या एका लॉजवर एका तरुणीचा मृतदेह आढळला.

ही घटना बुधवारी 4 वाजताच्या सुमारास लॉजवरील कर्मचाऱ्यांना समजताच पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांना घटनेची मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

तरुणीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र हत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

यामध्ये शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

Exit mobile version