Mon. Jan 24th, 2022

मुंबईत मुलीची बलात्कार करून हत्या, लिफ्टमध्ये आढळला मृतदेह

कुर्ल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ल्यात एका २० वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्टच्या रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला.

कुर्ल्यातील ही इमारत बंद असते. एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने हा मृतदेह पाहिला. त्या मुलाने लगेचच मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.

मुलीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात बलात्कारासह हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *