जगभरात जीमेल, गुगल आणि युट्यूब झालं डाऊन ; नेमकं कारण काय?
गुगल आणि युट्यूबची सेवा अचानकपणे झालं डाऊन…

गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध आहे. आज अचानकपणे गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) आणि युट्यूब सेवा अचानक बंद झाली. जगभरात ही सेवा डाऊन झाल्यानं अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत आहे, शिवाय यूट्युबवरही आणि जीमेलवरही एरर येतो आहे. ‘आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येतो आहे.
भारतात सुद्धा जीमेल आणि युट्युब सेवा डाऊन झाल्यानं अनेक अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्यानं त्यांची ही सेवा अचानकपणे डाऊन झाल्यानं वापरकर्त्यांना त्रास झाला आहे. वर्क फ्रॉम होम असणाऱ्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे वापरकर्त्यांना त्रास झाला.