Tue. Sep 29th, 2020

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या 63 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती शनिवारपासून खालावली होती. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. गेल्या वर्षी पर्रिकर यांनी स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर अनेक उपचारही करण्यात आले होते. या कर्करोगावर मनोहर पर्रिकर यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.

मनोहर पर्रिकर यांचेे निधन –

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता.

त्यांनी कर्करोगावर मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचारही घेतले.

पर्रिकर यांच्या निधनाची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *